ट्रॅव्हलच्या विरोधात आरटीओ अॅक्शन मोडवर

Foto
गणेशोत्सवात तपासणीसाठी विशेष पथके तैनात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गणेशोत्सवात गावाला जाणाऱ्या किंवा शहरात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्स आणि कंत्राटी बसचालकांकडून अवाच्या सवा भाडेवसुली केली जाण्याची दाट शक्यता असते. प्रवाशांची होणारी ही आर्थिक लूट रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंबर कसली असून, जिल्ह्यात विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. शासनाने ठरवून दिलेली कमाल मर्यादा ओलांडून मनमानी भाडे आकारणाऱ्या चालकांवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात
येणार आहे या कारवाईसाठी आरटीओ कार्यालयातील वायू वेग पथक क्रमांक १ ते ६ मध्ये कार्यरत मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके गणेशोत्सव काळात प्रवासी वाहतुकीवर लक्ष ठेवणार असून, जादा भाडे आकारणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमांनुसार
कारवाई केली जाणार आहे.
आरटीओचे आवाहन
आरटीओने नागरिकांना आवाहन केले आहे की, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही कंत्राटी बस किंवा अन्य प्रवासी वाहनाने शासनाने निर्धारित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्याचे आढळल्यास त्याची तक्रार तातडीने करावी. प्रवाशांनी जादा भाडे आकारणी झाल्यास तक्रार करताना शक्य असल्यास वाहनाचा क्रमांक, प्रवासाची तारीख, मार्ग, आकारलेले भाडे आणि तिकीटाची माहिती देणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे संबंधित वाहनाविरुद्ध कारवाई करणे अधिक सुलभ होईल.
ज्यादा भाडे घेणाऱ्यांची तक्रार करा
आरटीओ कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक १ ते ६ मध्ये कार्यरत मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके गणेशोत्सव काळात प्रवासी वाहतुकीवर लक्ष ठेवणार असून, जादा भाडे आकारणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमांनुसार कारवाई करणार आहेत. कुणी जादा भाडे वसुली केली तर त्याची तक्रार करा.
विजय काठोळे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions